राजकारणापासून सचिन दूरच राहणार?

मुंबई – मध्य प्रदेश काँग्रेसने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवस काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या वृत्ताबाबत तथ्य नसल्याचे सचिनच्या सूत्रांकडून स्पष्ट झाले होते. त्यानंतर सचिनने तसे स्पष्ट केल्याने मध्य प्रदेश काँग्रेसचा हा स्टंट थरला आहे. राजकारणापासून दूर रहावे, अशी बाबांची इच्छा होती असे सचीनने म्हतले आहे.

सचीन आपला प्रचारक आहे अशी शनिवारी काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते प्रमोद गुगालिया यांनी घोषणाही करून टाकली होती. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेसने सचिनला आणण्याचा खटाटोप केला. तसेच गुगालियांनी जाहीर केले. त्यामुळे सचिन प्रचाराला जाणार की नाही याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. त्यातच सचिनच्या सूत्रांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नसल्याने मध्य प्रदेश काँग्रेसची हवाच निघाली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसच्या या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे सचिनच्याच खुलाशाने स्पष्ट झाले आहे. मी राजकारणापासून दूर राहावे, अशी माझ्या बाबांची इच्छा होती. त्या मुळेच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी राजकारणात जाणार नाही, तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचारही करणार नाही, असे सचिन तेंडुलकर याने स्पष्ट केले आहे. सचिन सध्या हरियाणात रणजी सामना खेळत आहे.

Leave a Comment