हिंसक वळण टाळा

नरेन्द्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेच्या आधी पण सभेच्या ठिकाणी बॉंबस्ङ्गोट घडवण्यात आले. या स्ङ्गोटांनी निवडणुकीच्या बाबतीत एक वाईट संकेत दिला आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांना हा हिंेसक अपशकुन झाला आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत अशी दक्षता सरकारने घेतली पाहिजे. कारण काही लोक नरेन्द्र मोदी यांच्या लोकप्रियतेने हताश झाले आहेत. मोदींचे वाढते आकर्षण हा अनेकांना चकित करणारा प्रकार आहे. त्याचे आकलन अनेक जुन्या नेत्यांना होत नाही पण ही लोकप्रियता अनेकांना देखवेनाशीही झाली आहे. अशा काही लोकांनी काल मोदी यांच्या पाटण्यातल्या सभेत स्ङ्गोट घडवले. मोदी यांनी घाबरून जावे आणि लोकांनाही मोदी यांच्या सभेची भीती वाटावी हा या स्ङ्गोटांमागचा हेतू आहे पण आजवरच्या इतिहासात असे दिसून आले आहे की, अशा प्रकाराने कोणाचीही लोकप्रियता कमी न होता उलट वाढत असते. पाटण्यातल्या या विक्रमी सभेच्या आधी एक आणि सभेच्या ठिकाणी सात स्ङ्गोट झाले. त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले तर आठ जण जखमी झाले. मोदी यांची बिहारात मोठीच लोकप्रियता आहे. पण आधी भाजपाची नितीकुमार यांच्या जनता दलाशी युती असल्यामुळे मोदींनी बिहारात सभा घ्याव्यात की नाही यावर नितीशकुमार यांचा नकाराधिकार चालत असे. ते मोदी यांच्या सभांना अटकाव करीत असत.

मोदी हे नितीशकुमार यांच्यापेक्षा लोकप्रिय आहेत. मोदी बिहारात आले तर आपली लोकप्रियता त्यांच्यासमोर कमी पडेल आणि राज्यातले मुस्लिम मतदार आपल्यावर नाराज होतील असे नितीशकुमार यांना वाटत असे. आता तसा काही प्रश्‍न राहिलेला नाही, कारण आता युती राहिलेली नाही. मोदींनी बिहारात यावे की नाही हे नितीशकुमार ठरवू शकत नाहीत. मधल्या काळात नितीशकुमार यांनी अटकाव केल्याने मोदींची बिहारात सभाच झाली नव्हती. बराच काळ सोडून सभा झाल्याने सभेला गर्दी होत असतेच पण भारतीय जनता पार्टीने मोदी यांच्या सभांचे एक वेगळे तंत्र अवलंबिले आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी बराच काळ नियोजन करून सभा घेतल्या जात आहेत. होणारी प्रत्येक सभा ऐतिहासिक व्हावी आणि तिला पाच ते दहा लाख लोक यावेत असा मोठा प्रयत्न भाजपाचे नेते करीत आहेत. त्यामुळे मोदी यांची सभा साधारण पंधरा दिवसाला एक अशी होत असली तरीही ती महासभाच होत आहे आणि तिला होणारी उपस्थिती त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या काळजात धडकी भरणारी ठरत आहे. या सभा केवळ मोठ्या होत आहेत एवढेच त्यांचे वैशिष्ट्य नाही.

त्यांतून जनतेपर्यंत जाणारा संदेेश वेगळा आहे. मुस्लिम मते भाजपाच्या जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शरद पवार यांनी मोदींच्या पंतप्रधान होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहेे. पण आता पवारांचे अंदाज खरे ठरण्याचा काळ मागे पडला आहे आणि म्हणूनच पवार निवृत्त होत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय राजकारणात येण्याने राजकारणाचे रंग बदलत आहेत. त्यांचा अंदाज पवारांना आलेला नाही. भाजपा आणि मोदी यांची लोकप्रियता शहरी आणि मध्यम वर्गीयांपुरती असा परंपरागत अंदाज केवळ पवारच नाही तर असे अनेक नेतेही करत असतात. त्यांना मोठी हुलकावणी मिळणार आहे. कारण आता टीव्ही हे माध्यम शहरी राहिलेले नाही. ते खेड्यात आणि झोपडीझोपडी पर्यंत पोचले आहे. मोदी त्यांच्यापर्यंत पोचत आहेत. पवारांना आणि तत्सम नेत्यांना मोदी या वादळाचा नीट अंदाज आलेला नाही. मुस्लिम मते त्यांच्या विरोधात असतात आणि ते कधीच सत्तेवर येऊ शकत नाहीत हे त्यांचे गणित मोदी यांनी गुजरातेत सलग पाच निवडणुकांत उलटे पालटे करून टाकले आहे. त्यांच्या या झंझावाताचा खरा अंदाज काही लोकांंना आला आहे. उद्या चालून मुस्लिम मतदार भाजपाच्या बाजूने उभे राहिले तर काय होणार या कल्पनेने काही लोकांच्या पोटात गोळा उठला आहे. अशाच काही लोकांनी पाटण्याच्या मोदी यांच्या या सभेत बॉंबस्ङ्गोट घडवले आहेत.

नितीशकुमार यांच्या सरकारला या स्ङ्गोटांची पूर्वकल्पना होती पण त्यांनी काही हालचाल केली नाही. स्ङ्गोट टळावेत यासाठी काही कारवाई केली नाही. कारण स्ङ्गोट होणे हे काही लोकांच्या ङ्गायद्याचे आहे. मोदी यांच्या सभेत स्ङ्गोट होत असतात अशी प्रतिमा एकदा तयार झाली की, लोक त्यांच्या सभेला येण्याचे साहस करणार नाहीत आणि त्यांची लोकप्रियता कमी असल्याचे चित्र निर्माण करता येईल अशी काही लोकांची कल्पना आहे. स्ङ्गोट झाल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. केन्द्र सरकारच्या गृह खात्याने अहवाल मागितला आहे. पण हे सरकार आणि राज्य सरकार ङ्गार इमानदारीने तपास करील अशी अपेक्षा नाही कारण मोदी यांच्या सभेची भीती लोकांच्या मनात निर्माण होणे हे त्यांच्याही ङ्गायद्याचे आहे. या स्ङ्गोटांनी निवडणुकीच्या प्रचाराला हिंसाचाराचे गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती ङ्गार धोकादायक आहे. तसे होऊ नये म्हणून तरी सरकारने या स्ङ्गोटांची मालिका होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षात देशातल्या निवडणुका वरचेवर हिंसाचार मुक्त होत आहेत. तीच परंपरा कायम राहिली पाहिजे.