नारायण साईच्या शोधासाठी शिरगाव येथे छापा

शिरगाव – गेल्याी काही दिवसांपासून लपून बसलेल्यार वादग्रस्त अध्यात्मिक गुरू नारायण साईचा शोध पोलिसाकडून घेतला जात आहे. शुक्रवारी मध्य‍रात्री विरार पोलिसांनी शिरगाव येथील नारायण साईच्या आश्रमावर छापा टाकला. मात्र या आश्रमात नारायण साई सापडला नाही. गुजरात पोलीस गेल्या वीस दिवसांपासून देशभरात नारायण साईचा शोध घेत आहेत.

नारायण साईच्या शोधासाठी गुजरात पोलिसाचे एक पथक गेल्या पंधरा दिवसांपासून विरारजवळच्या शिरगाव येथील कुभांरवाडा आश्रमावर पाळत ठेवून होते. मात्र नारायण साई या आश्रमात आलेच नसल्याचे समजले. अतिशय आलीशान आणि भव्य अशा या आश्रमात एकही कर्मचारी किंवा नारायण साईचे शिष्यगणही नसल्याने पोलिसही अचंबित झाले आहेत.

शिरगाव येथील कुभांरवाडा आश्रमात नारायण साईसाठी अनेक आलीशान खोल्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आश्रमातील छाप्यात सापडलेल्या कागदपत्रात या आश्रमाच्या यूटीआय बँकेत २००५ पासून तब्बल चाळीस हजार रूपये जमा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या आश्रमाच्या आजूबाजूला राहणा-याकडूनही पोलिसांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या नागरिकांकडून पोलिसांना फारशी माहिती मिळाली नाही.