सोनमला आहे सिनेमा पाहण्याची आवड

अभिनेत्री सोनम कपूर अभिनयात प्रगती करता यावी म्हणून घरी बसून सिनेमे पाहण्यांचा आनंद लुटत असते. यावर्षी सोनम कपूरची दोन सिनेमे प्रदर्शित झाली. त्यामध्ये‍ राकेश ओम प्रकाश मेहराचा ‘भाग मिल्खा भाग’ आणि आनंद एल. रायच्याप ‘रांझणा’ हे सिनमे प्रदर्शित झाले आहेत. तिचे हे दोन्ही सिनेमे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ती भलतीच खूष आहे.

मुंबई मध्ये‍ सुरू असलेल्या १५ व्या मुंबई फिल्म महोत्सववेळी पत्रकारांशी बोलताना सोनम कपूर म्हनाली, ” मी घरी असल्यानंतर खूप सिनेमे पाहत असते. तसे पाहिले तर अभिनय हा मी स्वता निवडलेला एक व्यवयाय आहे. त्यामुळे सिनेमे पाहिल्याशिवाय अभिनय कसा करायचा हे सूचत नाही. त्यामुळे मी सिनेमे पाहत असते. प्रत्येेक गायक जसा रियाज करतो त्याचप्रमाणे मी देखील सिनेमे पाहून अभिनय शिकते. त्यामुळेच मी जास्तीत जास्त सिनेमे पाहत असते.

सोनम गेल्या काही दिवसांपासून यशराजच्या ‘बेवकूफियां’ या सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. ज्या‍मध्ये अभिनेता आयुष्यमान खुराना त्यांची सह-कलाकार म्हणून काम करीत आहे. याशिवाय आगामी काळात ‘खूबसूरत’ या सिनेमाचा रिमेक येत आहे.