मीही पकवू शकतो डाळ आणि खिमा- ओबामा

वॉशिग्टन – पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये वार्तालाप करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा कांही काळ त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत रमले आणि १९८० च्या त्या काळात पाक भेटीवर गेलो असताना तेथे डाळ व खिमा बनविण्यास कसे शिकलो हेही त्यांनी शरीफ यांना सांगितले. कॉलेजमध्ये त्यांचे दोन पाक रूममेट होते व त्यांच्यासोबत ओबामा यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. ती भेट खूपच वंडरफुल होती असे सांगून ओबामा यांनी या मित्रांच्या आईने आपल्याला डाळ व खिमा बनवायचा शिकविल्याचे सांगितले.

यावर शरीफ यांनी त्वरीत ओबामा आणि पत्नी मिशेल यांना पाक भेटीवर येण्याचे आमंत्रण दिले आणि डाळ व खिमा तुमची वाट पाहात आहेत असे सांगितले. या पदार्थांची लज्जत लुटण्यासाठी पाकला जरूर या असे शरीफ म्हणाले. कॉलेज दिवसांतील त्या पाकिस्तानी मित्रांमुळे आजही आपल्याला पाकिस्तानी लोकांबद्दल विशेष प्रेम वाटते असे ओबामा म्हणाले.

Leave a Comment