छोटया पडद़यावरून सिनेमात गेलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या खूपच फॉर्ममध्ये आहे. अभिनेता सुशांत सिंगने ‘काय पोचे’ सिनेमात चांगले यश मिळवले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये त्याचा चांगलाच भाव वधारला आहे. सुशांतकडे सध्या सिनेमाची ररांग लागली आहे. काही दिवसांपूर्वी शेखर कपूरच्या ‘पानी’ या सिनेमात त्याची चक्क ह्रतिक रोशनच्या जागी वर्णी लागली आहे. तेव्हापासून त्याचा भाव चांगलाच वधारला आहे. त्यामुळेच त्याने एका कार्यक्रमासाठी एक कोटी रूपये मागतिले आहेत.
आगामी काळात प्रत्येक कार्यक्रमासाठी सुशांतने मोठी रक्कम घ्यायची असा चंगच बांधलेला दिसत आहे. नवीन वर्षांच्या एका कार्यक्रमासाठी सुशांतने आयोजकांकडे एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. शेखर कपूर दिग्दर्शित ‘पानी’साठी सुशांतची निवड झाल्यानंतर त्याच्यात एक अजब आत्मविश्वास आला आहे. आत्तापर्यंत लाजराबुजरा वाटणारा सुशांत आता तसा राहिलेला नाही. ‘शुध्द देसी रोमान्स’ नंतर राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’मध्ये सुशांतने आमिरबरोबर काम केले. आता त्याच्याकडे ‘पानी’ आहे त्यापाठोपाठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरनेही आपल्या आगामी सिनेमासाठी ह्रतिकच्या ऐवजी सुशांतची निवड केली आहे.
सध्या मी एकापेक्षा एक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करतो आहे. त्यामुळे माझ्यासाठी योग्य मानधन घेण्याची ही संधी आहे, असे सांगत सुशांतने मनालीत होणा-या नव्या वर्षांच्या कार्यक्रमासाठी एक कोटी रुपये मागितले आहेत. त्याच्या या मागणीने बॉलिवूडमधल्या प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी सुशांतला मात्र त्यात काही वावगे वाटत नाही.