टीम इंडियाला आज विजय आवश्यक

रांची: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यारतील चौथी वन डे धोनीच्या रांचीमध्ये बुधवारी होत आहे. रांचीमध्ये होणारा हा दुसराच वन डे सामना आहे. भारताने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला धुळ चारली होती, पण आता भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. या मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक आहे.

टीम इंडियाविरूध्द जॉर्ज बेलीच्या ऑस्ट्रेलिया संघाने वन डे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सात सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. या सामन्यात आपल्या घरच्या मैदानात टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचे मोठं आव्हान महेंद्रसिंग धोनीसमोर आहे.

मोहालीमध्ये कॅप्टन कूल धोनीने जे कमावले होतं त्यावर ईशांत शर्माने पाणी फिरवले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या विजयाचा घास भारताच्या हातून निसटला होता. ऑस्ट्रेलियाकडे कर्णधार जॉर्ज बेली, अॅरॉन फिन्च आणि फिल ह्युजेस असे धडाकेबाज फलंदाज आहेत. बेलीने ३ सामन्यांत २२०, फिन्चने १६० तर ह्युजेसने १५२ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे रांचीत विजयाचा ध्वज फडकवायचा तर टीम इंडियाच्याह गोलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही वन डेत भारतीय गोलंदाजांनी सपशेल निराशा केली आहे. भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा आणि विनय कुमार या मध्यमगती तर अश्विन आणि जाडेजा या फिरकी गोलंदाजांना रांचीमध्ये आपली कामगिरी चोख बजावावी लागणार आहे तरच या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवीत येणर आहे

Leave a Comment