बिपाशा सिनीयर आहे- ईशा गुप्ता

काही दिवसांपूर्वीच सर्वत्र अभिनेत्री ईशा गुप्ता आणि बिपाशा बसु यांच्यामध्ये वाद झाला असल्याची बातमी वा-यासारखी पसरली होती. बिपाशाने या वाद झाल्याच्या बातमीला साफ नकार दिला होता. आता अभिनेत्री ईशाने देखील ही बातमी अफवा असल्यायचे म्हटले आहे. ईशाने बिपाशा ही आपल्या पेक्षा सीनियर असल्याचे म्हटले आहे.

यावेळी बोलताना ईशा गुप्ता म्हणाली, बिपाशा सोबत माझा कुठलाच सीन चित्रीत करण्याात आलेला नाही. या सिनेमात बिपाशा-रितेश देशमुख यांची जोड़ी आहे तर ईशा व सैफ अली खान सोबत दिसणार आहेत. त्यामुळे आमच्यात कसलेच कॉम्पिटिशन नाही. यापूर्वी आम्ही दोघींनी ‘राज-३ या सिनेमात एकत्रित काम केले आहे. त्यावेळेसपासून आमच्यातील संबध चांगलेच आहेत.

ईशाच्या- मते बिपाशा तिची सीनियर आहे. त्याशिवाय ती नेहमीच तिच्या सोबत चांगले वागत असल्याने तिच्याेबात माझया मनात कसलीच शंका नाही. ईशा आणि बिपाशामध्ये वाद झाला असल्यासची बातमी मीडियाने सर्वत्र पसरवली होती. गेल्या काही दिवसांपासून दोघीच्या बाबतीत पसरविण्यात आलेल्या अफवामुळे ईशा खूपच अपसेट झाली होती. सध्याा ईशा लंडनमध्ये आगामी काळात येत असलेल्या ‘हमशक्ल’ या सिनेमाच्या शूटिंग मध्ये बिजी आहे.