असिनच्या पार्टीला येणार सलमान, अमिर

आमिर खानच्या अपोजिट ‘गजनी’ या सिनेमातून बॉलिवुड करियरची सुरूवात करणारी अभिनेत्री असिन आता फॉर्ममध्ये आहे. असिनने सिनेमातून अभिनेता सलमान खान आणि अजय देवगन यांच्या अपोजिट काम करून लोकप्रियता मिळवली आहे. असिनने आगामी काळात हात असलेल्या तिच्या ग्रैंड बर्थडे पार्टीसाठी बॉलीवूडमधील आमिर, सलमान, अक्षय, अजय, जॉन आणि जैकलीन सारख्या स्टार्सना निमत्रंण दिले आहे.

असिनचा वाढदिवस २८ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासर्व स्टार मंडळीशिवाय तिच्या गेस्ट लिस्टमध्ये सोनम कपूर, रवीना टंडन आणि साजिद नाडियाडवालाचे नाव देखील सहभागी आहे. २८ आक्टोबर रोजी ती २६ वर्ष पूर्ण करीत आहे. असिनने १०० कोटीच्याग क्लबमध्ये सहभागी होताना सलमान खान, शाहरुख खान आणि करीना कपूरची बरोबरी केली आहे. ‘गजनी’ साठी तिला बेस्ट फीमेल डेब्यूचा अवॉर्ड मिळाला आहे.

सल्लूच्या अपोजिट ‘रेडी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला तर साजिद खानचा ‘हाउसफुल-२’ हा सिनेमा देखील हिट झाला. अजय देवगन सोबत ‘बोल बच्चन’ आणि अक्षय कुमार सोबतचा ‘खिलाड़ी ७८६’ हा असिनचा सिनेमा देखील हिट ठरला आहे. गेल्यार काही दिवसांपासून बॉलिवुडच्या पार्टी सर्किट पासून गायब झालेली असिन आता पुन्हा एकदा सहभागी झाली आहे.

Leave a Comment