तामिळनाडूत पर्यटकांसाठी झाडावरची घरे

चेन्नई – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातल्या तिरुचिलापल्ली आणि तिरुवनूर या दोन पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तिरुचिलापल्ली जिल्ह्यातील पचमलाई या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्यातून या गावात काही झाडांवर घरे बांधण्यात येणार आहेत.

tamilnadu2ही झाडावरची घरे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरतील अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय या गावातील विश्रांती गृहाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. पचमलाई हे ठिकाण समुद्र सपाटीपासून एक हजार मीटर उंचीवर आहे.

tamilnadu

या पर्यटन स्थळापासून जवळच पेरियापक्कलम् आणि कोरायारु हे दोन नयनमनोहर धबधबे आहेत. या व्यतिरिक्त या गावात काही दुर्मिळ पक्षी बघायला मिळतात.

tamilnadu3

या व्यतिरिक्त राज्य सरकारने तिरुवरुर या जिल्ह्यातील मधुपेट्टाई या समुद्राकाठी असलेल्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी २ कोटी १७ लाख रुपये मंजूर केले आहेत. मधुपेट्टाई हे ११ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावर विकसित केलेले आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी असलेल्या जलपर्णीमुळे शेकडो पक्षी तिथे येत असतात आणि हिवाळ्यात अनेक प्रकारचे पक्षी बघायला मिळतात.

tamilnadu1

या मधुपेट्टाई येथील जलविहार तलावामध्ये फायबर ग्लासपासून तयार केलेल्या बोटी आणण्यासाठी या निधीतला मोठा हिस्सा खर्च होणार आहे. या परिसरात येणारे स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी वॉचिंग टॉवर उभे करण्याचाही विचार असून त्यावर या निधीतून खर्च होणार आहे.

Leave a Comment