मुंबई – रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाल्याची घटना भायखळा रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. भायखळा रेल्वे स्थानकाजवळ खोपोलीहुन सीएसटीकडे जाणा-या फास्ट लोकलने धडक दिल्याने तीनही जणांचा मृत्यू झाला.

हुसेन हवालदार, फतीमा हवालदार आणि जेहरा हवालदार अशी मृतांची नावे आहेत. तीघेही भुसावल एक्सप्रेसने मुंबईत येत होते. ही एक्सप्रेस भायखळा स्थानकाजवळ असलेल्या ब्रीज जवळ उभी होती, त्याचवेळी तीघेही ट्रेनमधुन उतरुन रेल्वे रुळ ओलांडत असतांना खोपोलीहुन सीएसटी कडे जाणा-या फास्ट लोकलने तिघांना चिरडले.
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार मृतांकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन हे राजस्थानचे रहिवाशी असून तिघेही एकाच परिवारातील असल्याचे समजते.