बनावट जात प्रमाणपत्र ; जि. प. अध्यक्षवर गुन्हा

औरंगाबाद – बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविणारे काँग्रेसचे नाहीदबानो पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याबरोबर खोटी कागदपत्रे पुरविणार्या सातारा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू यांच्याविरोधातही सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी सुभाष भुजंग यांनी सातारा पोलीस ठाण्यात नाहीदबानो पठाण आणि मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. नाहीदबानो पठाण यांनी मोमीन जातीचे खोटे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करून डिसेंबर 2012 ते जुलै 2013 पर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सत्ता उपभोगली. त्यामुळे या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment