अमेरिकेवर सार्‍या जगाची नजर

वॉशिंग्टन – अमेरिकन कर्ज संकटावर अजून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे जगातील सर्वच देशांच्या बाजारांचे लक्ष सध्या अमेरिकेकडे लागले आहेत.परवा रात्री (भारतीय प्रमाण वेळेनुसार अमेरिकेचा सकाळी) अमेरिकेचा डेमोक्रेट व रिपब्लिकन या दोन्ही गटांमध्ये चर्चा झाली.परंतु चर्चेमध्ये अद्यापही कोणताही तोडगा न निघाल्यामुळे अमेरिकन शेअर बाजार जोरदार आपटले.

या दोन्ही गटांमधील नेत्यांना काहीतरी तोडगा निघेल अशी अशा होती. परंतु अजूनही तोडगा न निघाल्यामुळे अमेरिकेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि याचाच थेट परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत तसेच या संकटावर लवकरात लवकर उत्तर सापडलं नाही तर अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकते. यामुळे अमेरिकेचा शेअर, चलन, कर्जरोखे यासारख्या आर्थिक बाबींमध्ये विक्रीची आशंका निर्माण झाली आहे. यामुळे डॉलर कमकुवत होऊन अमेरिकेमध्ये महागाइचा भडका उडू शकतो.

अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे. कारण अमेरिका ही जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे तिला कोणताही फटका बसला तर आपोआपच याचा परिणाम जगातील विकसनशील देशांवर पडू शकतो आणि त्यामुळे संपूर्ण जग आता अमेरिकेकडे डोळे लावून बघत आहे.