चीनच्या कुरापती सुरूच !

नवी दिल्ली – चीनकडून वेळोवेळी कोणता ना कोणता खटाटोप सुरूच असतो. अशीच नवी खेळी चीनकडून करण्यात आली आहे. चीनने भारताचा पारंपारिक शत्रू असणा-या पाकिस्तानला दोन अणूभट्ट्या देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयाला भारताकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. चीनकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे तसेच भारताने राजकीय स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर यासंबंधीचा विरोध दर्शविला आहे.

अनेक प्रश्नांच्या कचाट्यात अडकलेल्या चीनने पहिल्यांदाच स्वदेशनिर्मीत 1100 मेगावाटचे न्यूक्लियर सिरीज विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. 1100 मेगावाटच्या न्यूक्लियर सिरीजला एसीपी 1000 या नावानेही ओळखले जाते. तर कराचीत स्थापन करण्यात येणा-या प्रोजेक्टची किंमत जवळपास 9.6 बिलीयन डॉलर एवढी आहे. पाकिस्तानकडे 100 पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे 60 ते 80 अण्वस्त्रांचा साठा आहे. पाकिस्तान झपाट्याने अण्वस्त्रांचा साठा वाढवित असल्याचे यावरूनच स्पष्ट होते. भारताने न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुपमध्ये अणूभट्ट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता; परंतु त्याचा परिणाम झाला नाही. पाकिस्तानचा अणू कार्यक्रम सैन्यापासून वेगळा राहूच शकत नाही, असे भारताने चीनला वारंवार सांगितले आहे.

या कराराची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरू होती; परंतु या वर्षी या करारावर निर्णय घेण्यात आला आहे तसेच मागच्या वर्षापासून दिल्लीत याविषयीची चिंता व्यक्त करणारा अहवाल सादर करण्यात आला होता. चीनच्या चायना नॅशनल न्यूूक्लियर कॉरपोरेशन लिमिटेडने पाकिस्तानच्या अथॉरिटीज सोबत प्रारंभिक कमर्शियल कॉन्टड्ढॅक्टवर हस्ताक्षर केले असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळेच भारताकडून यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या काही महिन्यांपासून भारताने चीनसमोर याविषयी चिंता व्यक्त केली होती. जर चीनकडून पाकिस्तानला अशा प्रकारची कोणती मदत करण्यात आली तर हा सरळ सरळ भारताच्या सुरक्षेवर करण्यात आलेला हल्ला असेल, असेही चीनला सांगण्यात आले होते; परंतु या करारावरून चीन आपल्या कुरापती करण्याचे सोडत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.

चीन एनपीटीचा सदस्य असल्यामुळे चीनने हे अण्वस्त्र पाकिस्तानला देणे चुकीचे असल्याचेही भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात आले होते. पाक अण्वस्त्रे शांततेसाठी वापरणार नाही. दरम्यान भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या करारावर आक्षेप नोंदवत पाकिस्तानने आजपर्यंत अण्वस्त्रांचा वापर हा शांंततेसाठी केला नसल्याचा आरोप केला आहे तसेच पाकिस्तानकडे अण्वस्त्राचा वापर करण्याचे तंत्रज्ञान नसल्याचेही भारताकडून सांगण्यात आले आहे.