मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच -आडवाणी

अहमदाबाद – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर नाराज झालेल्या लालकृष्ण आडवाणींनी आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्ता मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास मला आनंदच होईल अशा शब्दात आडवाणींनी मोदींना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

आडवाणी हे अहमबादमध्ये कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात मोदीही उपस्थित होते. मोदींची भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आडवाणींनी मोदींसोबत दुसर्यांदा जाहीर कार्यक्रमात हजेरी लावलीय. यापूर्वी अडवाणी आणि मोदी भाजपच्या भोपाळमधल्या सभेत एकत्र दिसले होते.

आडवाणींनी आपल्या भाषणात वाजपेयींच्या काळातलं केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्य सरकारांचं कौतुक केलं. आडवाणींनी मोदींचं कौतुक करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून अडवाणींच्या वक्तव्याचं स्वागत केलं. अडवाणींचं हे वक्तव्य म्हणजे भाजपमध्ये सर्व नेते एकदिलानं काम करतायत असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment