सुशील शर्माला फाशी ऐवजी जन्मनठेप

नवी दिल्ली : दिल्लीतील नयना सहानीच्यात मृतदेहाचे तुकडे तंदूरमध्ये जाळल्या प्रकरणी आरोपी सुशील शर्माला सर्वाच्च न्यायालयाने फाशीची शिक्षक ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुशील शर्माला मरेपर्यंत तुरूंगातच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरन्यायाधिश पी. सतशिवम यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने आदेश दिले आहेत. सुशील शर्मा दिल्लीतील युवक काँग्रेसचा माजी नेता आहे.

सरन्यायाधिश पी. सतशिवम यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. दिल्लीतील युवक काँग्रेसचा माजी नेता असलेला सुशील शर्मा या प्रकरणात प्रमुख आरोपी आहे. १३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवला होता. त्याटनंतर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. यावेळी आरोपी सुशील शर्माला सर्वाच्च न्यायालयाने फाशीची शिक्षक ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नयना साहनी ही सुशील शर्माची पत्नी होती, त्याने २ जुलै १९९५ च्या रात्री तिचा गोळ्या घालून खून केला आणि प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी दिल्लीतील एका हॉटेलच्या तंदूर भट्टीचा वापर केला. तेव्हाच हे प्रकरण उघडकीस आले होते. त्याला आता अठरा वर्षे होत आहेत.