चेन्नई – तब्बल १५ कोटी रूपये किंमतीचे ३२ किलोचे सोने एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात सापडले. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ कोटी रुपये असल्याचे समजते.

याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स संचलनालयाच्या अधिका-यांनी मूळच्या केरळच्या अब्दुल गफूर नसरून आणि मोहम्मद जैनुल हुसैन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे दोघंही सकाळी साडे पाचच्या सुमारास दुबईहून भारतात दाखल झाले होते. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या दोघांनी आपण सोन्याची तस्करी केल्याचे कबूल केले. सोने कुठंय? हा प्रश्न विचारल्यानंतर या दोघांनी ३२ किलोची सोन्याची बिस्कीटे ज्या विमानातून भारतात आलो, त्याविमानातील शौचालयात लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.
शौचालयात सोने का दडवून ठेवला हा प्रश्न विचारल्यानंतर या दोघांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांची नावे घेतली आणि या चौघांचा भांडा फुटला. मोहम्मद युसुफ अब्दुल आणि मोहम्मद यासिन अब्दुल हुसैन हे त्यांचे दोन साथीदार दिल्लीला याच विमानाने जाणार होते. तिथून हे शौचालयात दडवून ठेवलेले सोने ताब्यात घेणार होते. ही माहिती मिळाल्यानंतर, ६ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीला रवाना होणा-या याच विमानात तयार असलेल्या या दोघांना पोलिसांनी अटक केली.