नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोर्टात याचिका

लखनऊ: ‘आधी शौचालय, मग देवालय’ या वक्तव्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. वाराणसी येथी कोर्टात मोदीं यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. कलम ‘१५३ क’ अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे या याचिकेकडे लक्ष लागले आहे.

वाराणसीतील साधू संतानी भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शौचालयाला प्राथमिकता देताना देवालयाचा उल्लेख का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळेच देशभरताल्या नागरिकांच्या धार्मीक भावना दुखावल्याचा आरोप मोदींवर केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवरील सभेत नरेंद्र मोदींनी ‘आधी शौचालय, मग देवालय’ असा नारा दिला होता. गावागावात देवालये आहेत पण शौचालये मात्र नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी असे मोदीं यांनी येथील भाषणातून नमूद केले होते. या प्रकरणी आता कोर्टात याचिका दाखल झाल्यालने सर्वांचे लक्ष आता याचिकेकडे लागले आहे.