सचिनने ओलंडला ५० हजार धावांचा टप्पा

नवी दिल्ली: सर्व प्रकारच्या क्रि‍केटमध्ये ५० हजार धावांचा टप्पाय ओलांडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनोख विक्रम प्रास्थायपित केला आहे. सचिनने प्रथम दर्जाच्या क्रिकेटसह, वन डे आणि ट्वेन्टी२० सामन्यांत मिळून ५० हजार हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. अशा स्वरुपाची कामगिरी करणारा तो जगातील सोळावा फलंदाज ठरला.

राजस्थना रॉयल्स विरूध्द चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात सचिनने सव्विसावी धाव घेऊन ही कामगिरी बजावली. या सामन्यात सचिनने ३५ धावांची खेळी केली असून, आता त्याच्या नावावर ५०,००९ धावा जमा झाल्या आहेत. त्याच्या या दमदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये उडी घेतली आहे.

प्रथम दर्जाच्या क्रिकेटसह वन डे आणि ट्वेन्टी२० सामन्यांत मिळून सर्वाधिक धावा इंग्लंडच्या ग्रॅहम गूचच्या नावावर जमा आहेत. त्याने ६७,०५७ धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी सचिनला आगामी काळात आणखीन १७ हजार धावा काढव्या लागणार आहेत.

Leave a Comment