पुणे । प्रतिनिधी
नॅशनल स्पोर्टस् ट्रस्ट,पुणे यांच्यातर्फे कि‘डा क्षेत्रात उ‘ेखनीय कार्य करणार्या महिलांना देण्यात येणारा ‘तुळजाभवानी राज्य कि‘डा पुरस्कार 2013’ आज जाहीर करण्यात आले. तसेच यंदा चाळीस वर्षापासून कि‘डा क्षेत्रात भरीव योगदान देणार्या कि‘डाशिक्षिका श्रीमती सुधा कुलकर्णी यांना ‘विशेष जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल स्पोटर्स ट्रस्टच्या सरचिटणीस मनिषा घाटे-कोंढाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तुळजाभवानी राज्य क्री‘डा पुरस्कार सुधा कुलकर्णी, अंजना ठमके, पि‘यंका मोहिते याना जाहीर
तुळजाभवानी वरिष्ठ खेळाडू पुरस्कार एव्हरेस्टवीर गिर्यारोहक प्रियंका मोहिते, कनिष्ठ खेळाडू पुरस्कार आशियाई युवा कि‘डा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारी धावपटू अंजना ठमके, सर्वोत्कृष्ठ महिला कि‘डा संघटक खो-खोपटू कल्पना तेंडूलकर, विशेष पुरस्कार बॅडमिंटनपटू गौरवी वांबूरकर, मार्गदर्शक अनंत शेळके, क‘ीडापत्रकार पुरस्कार जान्हवी मुळे, कि‘डासंस्था पुरस्कार पुना गर्ल्स स्पोर्टस् असोशिएशन, पुणे आणि आदर्श पालक पुरस्कार सोलापूर येथील वंदना लोंढे यांना तुळजाभवानी राज्य कि‘डा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कि‘डा क्षेत्रात उ‘ेखनीय कामगिरी करणार्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 9 महिला खेळाडूंना दरवर्षी नवरात्री महोत्सवात या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाचे हे 12 वे वर्ष असून दहा हजार रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
