फौंड्री उद्योगाचे संशोधन आणि विकास केंद्र रांजणगाव येथे

पुणे : – बाक्हो लोडर पासून ते फौंड्री उद्योगाला लागणारी यंत्रसामग्री तयार करणारी युरोपातील आघाडीच्या करारो समुहाने इटलीबाहेर सर्वात मोठे संशोधन आणि विकास केंद्र पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत स्थापन केले असून त्याकरिता तसेच विस्तारित प्रकल्पासाठी १ ० लाख युरो गुंतवणूक करण्यात आल्याचे समूहाचे मुख्याधिकारी अलेक्झांडर बोस्सार्द यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले .

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या नव्या संशोधन केंद्राचे उद्घाटन आणि आज झाले . या प्रकल्पात १ १ ० ० कर्मचारी काम करत आहेत . त्यातील ४ ५ संशोधन केंद्रात आहेत . यावेळी इटलीचे भारतातील राजदूत डेनियाल मेन्सिनि , वाणिज्य दूत उगो सिअरलातानी हेही उपस्थित होते .
कंपनीच्या कामगिरीची माहिती देताना बोस्सार्द पुढे म्हणाले की , अमेरिका ,जर्मनी ,इटलीनंतर भारत ही आमची महत्वाची बाजारपेठ आहे. आमची येथील वार्षिक विक्री १ ३ कोटी युरो इतकी असून त्यातील निम्मे उत्पादन निर्यात केले जाते. संशोधन केंद्रात भारताच्या बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन उत्पादनांची रचना आणि निर्मिती केली जाणार आहे . कृषी क्षेत्राची वाढ आम्हाला पोषक आहे . व्होल्वो , अशोक लेलंड , महिंद्र आदी कंपन्या आमच्या ग्राहक आहेत . भविष्यात मागणी वाढल्यास आम्ही आणखी गुंतवणूक करून प्रकल्प विस्तार करणार आहोत.

भारताप्रमाणे चीनमध्ये आमचे दोन प्रकल्प आहेत मात्र येथील उत्पादन खर्च स्वस्त मनुष्यबळामुळे कमी आहे . नुकतीच चीन सरकारने धोरणे बदलल्याने तेथील कामगारांचा पगार वाढवावा लागला म्हणून आम्ही भारतात आलो आहोत. कृषी क्षेत्राला लागणारी ट्रान्समिशन टी टेन श्रेणी आज बाजारात आणण्यात आली.
…………………