ठाणे – कोणतेही सरकार किंवा पालक आपल्या मुलांना बलात्कार करायला शिकवत नाही, मुळात मानसिकता बदलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आज (बुधवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे – सुप्रिया सुळे
समाजात घडणार्या या सर्व घटनांची जबाबदारी सरकार घेत असून, पोलीस यंत्रणेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी इथे स्पष्ट केले. एक बलात्कार झाला तरी संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आणि सरकार आपली जबाबदारी घेत आहे, परंतु जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने ठाण्यात युवतींसाठी वक्तृत्व, नेतृत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.\
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा कांडाचा तपास योग्य दिशेने सुरू असून पोलीस यंत्रणेवर आपला पूर्ण विश्वास असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपच्या विरोधात आम्ही नेहमीच लढत आलो असून जातीच्या आणि धर्माच्या नावावर देश तोडण्याची भूमिका आमची नाही, असे म्हणत सुप्रिया यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
