हृदयाची धडधड

heart
काही लोकांना हृदयाचे ठोके एकदम वाढण्याचा त्रास होत असतो. तसे साधारणतः आपण पळत सुटलो, एखादे संकट समोर उभे राहिले किंवा अनपेक्षितपणे आपल्या भावना भडकवणारी घटना घडली, खूप राग आला किंवा उत्तेजीत करणारा अनुभव आला की छातीची धडधड वाढते. परंतु काही लोकांमध्ये अशी धडधड उगाचच होते. शरीराच्या कसल्याही असाधारण हालचाली न होता ते हृदयाचे ठोके वाढतात.

अशा लोकांमध्ये प्रसंगा प्रसंगाने किंवा काही प्रसंग नसतानाही छातीची धडधड वाढली की काही वेळाने ती कमी होते. परंतु या प्रक्रियेचे काहीतरी कायमचे अंश त्यांच्या शरीरात राहून जातात म्हणजे काहीतरी कायमस्वरूपी नुकसान होऊन गेलेले असते. हा विकार प्रामुख्याने मानसिक असतो. त्याची कारणे प्रामुख्याने मानसिक असली तरी आपल्या नकळतपणे आपल्या शरीरात निर्माण झालेले काही दोष किंवा विविध अवयवातल्या काही गोष्टींचे अभाव हेही त्यास कारणीभूत असतात. शरीरामध्ये पोटॅशियमची पातळी कमी झाली किंवा डीहायड्रेशन झाले तरीसुध्दा हृदयाचे ठोके अनियमित होतात.

रक्तातील शर्करा कमी झाल्यामुळेसुध्दा धडधड होते. अधिक कॉङ्गी पिणे, चॉकलेटचे प्राशन करणे किंवा मर्यादेच्या बाहेर दारू पिणे यामुळेही हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. मादक द्रव्य आणि निकोटीन हे सुध्दा छातीतल्या धडधडीस कारणीभूत ठरतात. गरोदर अवस्था, रजो निवृत्तीची अवस्था, रक्त कमी होणे, हृदयविकार, हृदयाच्या झडपांमधले दोष यामुळे सुध्दा छातीत धडधड करू शकते. यागोष्टी टाळण्यासाठी संतुलित आहार तर आवश्यक आहेच पण शक्य तो मनाचा प्रक्षोभ होणार नाही याची दक्षता घेणे, ध्यान आणि प्राणायाम करणे, वाटेल ती अनुचित पेय प्राशन करण्याचे टाळणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टी सांभाळल्या की हा विकार मर्यादेत राहतो.

प्रत्यक्षात छातीचे ठोके वाढण्यावर कसलाही औषधोपचार नाही. कारण छातीचे ठोके वाढणे हे काही विकारांचे लक्षण आहे. तेव्हा ते विकार आटोक्यात ठेवले की हृदयाचे ठोके अनियमित होण्याचे प्रसंगच येत नाहीत. कसलीही व्यसने न करणे, भरपूर विश्रांती घेणे आणि दिनचर्या नियमाने पाळणे या गोष्टी सांभाळल्या तरीसुध्दा या त्रासापासून दिलासा मिळू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment