जम्मू – जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास पाकने गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने स्पट केले आहे.
पाक सैन्याचा सीमेवर पुन्हा गोळीबार
एकीकडे रविवारी न्यूयॉर्कमध्ये मनमोहन सिंह आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांची भेट झाली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या भेटीत सीमेपलीकडील दहशतवाद थांबविण्यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांना फटकारलं होतं. पंतप्रधान भारतात परतताच पाकिस्ताननं पुन्हा हा हल्ला केला आहे.
काल झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख उत्तर दिलं. ऑगस्ट महिन्यात पाक सैन्यानं भारतीय लष्करातील पाच जवानांची निघृण हत्या केल्यानंतर सीमारेषेवर अत्यंत तणावपूर्ण स्थिती असून सतत संघर्ष सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.
