राफेल नदालची विजयी सलामी

बीजिंग- चीन ओपन टेनिस स्पर्धेत जगातील नंबर वन महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने तिसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत नोवाक योकोविक आणि राफेल नदालने शानदार विजयी सलामी दिली. या सामन्याकने नोवाक योकोविक आणि राफेल नदालने आगेकूच सुरू ठेवली. दुसरीकडे भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅक या पॅन पॅसिफिक ओपन चॅम्पियन जोडीने स्पर्धेत महिला दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

चीन ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने कोलंबियाच्या सॅटिगो गिराल्डोचा ६-२, ६-४अशा फरकाने पराभव केला. अमेरिकेच्या सेरेनाने इटलीच्या फ्रान्सेस्कावर ६-४, ७-५ अशा फरकाने विजय मिळवला. अव्वल मानांकित नोवाक योकोविकने चेक गणराज्यच्या लुकास रसूलवर ६-०, ६-३ने मात केली.

दुसरीकडे भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅक या पॅन पॅसिफिक ओपन चॅम्पियन जोडीने स्पर्धेत महिला दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र, पुरुष एकेरीत भारताच्या सोमदेव देववर्मनला सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.