शाहीद-सोनाक्षीच्या ‘आर…राजकुमार’चे ट्रेलर लाँच

काही दिवसांपूर्वीच्याम फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमानंतर आता अभिनेता शाहीद कपूर प्यार…प्यार…प्यार… आणि मार…मार…मार… म्हणत प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी काळात शाहीद-सोनाक्षी आणि सोनू सूदचा आगामी काळात येत असलेल्या. ‘आर…राजकुमार’ या सिनेमाचे ऑफिशियल पहिले ट्रेलर लाँच करण्यात आले आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे. या शिवाय त्याने या सिनेमात छोटा रोल ही केला आहे. या सिनेमात अभिनेता शाहीद कपूर भरपूर अक्शन करताना दिसणार आहे. याबाबत बोलताना शहिद कपूर म्हणाला, ‘मी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. या सिनेमासाठी माझ्यासोबत सोनाक्षने देखील खूप कष्टम घेतले आहे.’

इरोज इंटरनॅशनलचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे निर्माते आहेत विकी राजानी. आगामी काळात रिलीज होत असलेल्या रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ सिनेमासोबत ‘राजकुमार’ या सिनेमाचा ट्रेलर बघता येईल. ‘राजकुमार’ हा सिनेमा ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment