चॅम्पियन्स लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा दुसरा विजय

जयपूर – चॅम्पियन्स लीग टी-२० सामन्यात शानदार कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने लॉयन्सवर ३० धावांनी पराभूत करीत दुसरा विजय मिळविला.राजस्थान रॉयल्सच्या विजयात बॅड हॉज (नाबाद ४६) व सामनावीर प्रवीण तांबे १५ धावांत ४ बळी घेत महत्वपूर्ण योगदान राहिले.

टॉस जिकल्यानतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८३ धावा केल्यात होत्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार राहूल द्रवीड (३१), शेन वॉटसन (३३) आणि स्टुअर्ट बिन्नी (३८) यांनीही फलंदाजीत योगदान दिले.प्रत्युत्तरा दाखल लायन्सला ९ बाद १५३ धावाच काढता आल्या. लायन्सकडून धावांचा पाठलाग करताना कर्णधार आल्विन पीटरसनने सर्वाधिक ४० धावा काढल्या. त्याच्याशिवाय विजोनने २४ आणि सोलेकिलेने २१ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत राजस्थायन रॉयल्सच्या प्रवीण तांबेने ३ षटकांत १५ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. व्ही. मलिक आणि जेम्स फ्युकनर यांनी प्रत्येकी दोघांना टिपले.

दुस-या एका सामन्यात न्यूझीलंडच्या ओटागोने बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्क्रॉचर्सला ६२ धावांनी हरवले. न्यूझीलंडच्या ओटागोच्या ब्रुमने ५६ चेंडूंत ९ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद ११७ धावा ठोकल्या. ओटागोने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २४२ धावांचा स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात स्क्रॉचर्सला ६ बाद १८० धावाच काढता आल्या. त्यांच्याकडून हिल्टन कार्टराइटने नाबाद ७३ धावा काढल्या.