उल्हासनगर- एका १९ वर्षीय तरुणीचे शेजारी राहणा-या रिक्षाचालकाने अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही अंबरनाथमधील जावसई गावात रविवारी घडली. घर शेजारी राहणा-या तरूणीचे अपहरण केल्यानंतर या तरुणीला देहव्यापारासाठी विकण्याचा त्याचा घाट होता. मात्र, तिने पलायन केल्याने हा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींला अजून अटक करण्यापत आली नाही.
ही पिडित तरुणी अंबरनाथच्या जावसई गावात तिच्यार कुटुंबा समवेत राहते. रविवारी दुपारी जवळच्या वसाहतीत राहणा-या भावाकडे ती जात होती. त्या वेळी तिच्या शेजारी राहणा-या हरिकांत शुक्ला नामक रिक्षाचालकाने तिचे भावाकडे सोडतो असे सांगून अपहरण केले. त्यावनंतर तिला बुवापाडा येथे नेले तिच्यावर त्याभठिकाणी बलात्कार केला.
याप्रकरणी तरुणीने अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तरुणीला विकण्याचा कट शुक्ला व त्याच्या साथीदारांनी रचला होता. अपहरनानंतर तिला बुवापाडा येथील एका घरात डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, या परिसरात राहणा-या नागरिकांनी तिला मदत केल्याने तिची सुटका झाली.