म्हैसूर – टीम इंडियाच्या युवा खेळाडूची बुधवारपासून वेस्ट इंडीज अ संघाविरुद्धच्या चारदिवसीय सामन्यात कसोटी लागणार आहे. भारत अ संघाचे नेतृत्व फॉर्मात असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या हाती सोपविण्यात आले आहे. बुधवारपासून वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध होत असलेल्या सामन्यात त्याची कसोटी लागणार आहे.
सौराष्ट्रच्या चेतेश्वर पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. हा सुर मालिकेतही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आंतरराष्ट्रीय कसोटीत मोठे स्कोअर केल्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव मालिकेत शतक ठोकले होते. यानंतर दुसर्यास लढतीत त्याने ५४ धावा काढल्या होत्या.
वेस्ट इंडीज अ संघाने वनडेत ज्याप्रमाणे चांगली कामगिरी केली, त्यावरून पुजाराच्या युवा संघाला सावध राहावे लागेल. वेस्ट इंडीज संघाला सहज घेण्याची चूक करता येणार नाही. अहमदाबादचा डावखुरा फलंदाज मनप्रीत जुनेजाचा सुद्धा आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी खेळेल. त्याने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दोन सामन्यात २३६ धावा काढल्या होत्या.