मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या फिल्म सिटीमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘कॉमेडी नाईटस विथ कपील’चा सेट आगीच्या तांडवात जळून खाक झाला. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवारी सकाळी कॉमेडी नाईटस विथ कपिलच्या सेटवर लागलेल्या या आगीने अवघ्या काही मिनिटातच सेट जळून खाक झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण सेट जळाला होता.
या सेटला लागलेल्याल आगीचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठया प्रमाणात सेटचे नुकसान झाले आहे.