गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर नवीन घर खरेदी करण्याचा विचार करीत होती. त्यासाठी सोनम काही दिवसांपासून घराचा शोध घेत होत होती. आता तिला जुहू जवळ घर मिळाले आहे. सोनमला पसंद असलेल्या ठिकाणीच तिला हवे तसे घर मिळाले आहे. त्यामुळे सध्या ती भलतीच खूष आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जुहूमध्ये तिला एक घर पसंद पडले होते. तिला आवडलेला २५ हजार स्क्वेअर फूटचा नवीन फलॅट तिने खरेदी केला आहे. सोनम आता जुहू येथील नवीन घरात तिच्या पैरंट्स सोबत राहत आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार सोनम खूप दिवसांपासून स्पेशियस घराचा शोध घेत होती. त्या ठिकाणी तिला फिल्ममेकर्स सोबत स्क्रिप्ट आणि रोल्सच्या बाबतीत तिला चर्चा करता यावे असा तिचा उद़देश होता.
‘रांझणा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या दोन सिनेमाच्या यशानंतर सोनमने तिच्या नवीन प्रॉजेक्ट असलेल्या ‘खूबसूरत’ या सिनेमातून काम करण्यास सुरूवात केली आहे. आगामी काळात येत असलेला हा सिनेमा तिची बहीण रिया कपूर प्रड्यूस करीत आहे. सोनमने प्रॉपर्टी फायनल केली असून डील आणि कागदपत्रे तयार करण्यात आली असल्याने तिच्यावर वडिल अनिल कपूर खूष आहेत. सोनम स्वता या घराचे इंटीरियर डेकोरेशन काम करीत आहे.