
सिनेमाची सिरीज म्हटली की त्यात काहीना काहीतरी नवीन हे असंतच.. मात्र, तरीही सिनेमातली एखादी गोष्ट ही सिनेमाचा युएसपी असते आणि तोच ठरतो सिनेमाच्या सिरीजचा ट्रेण्ड. असाच बिकिनी ट्रेण्ड धूमच्या तिस-या सिरीजमध्येही पाहायला मिळतोय. धूम-३ सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.. आमिर खान जसं सिनेमाचं आकर्षण आहे तसंच कतरिना कैफचा बिकीनी अवतारसुद्धा धूम-३चं आकर्षण ठरतंय. धूम च्या याआधीच्या सिरीजमध्येही बिकिनीचा हा ट्रेण्ड पहायाल मिळाला होता.. धूममध्ये इशा देओलने त्यासाठी खास ट्रेनिंग घेतलं होतं.. तर धूम-२ मध्ये ऐश्वर्या राय आणि बिपाशा बासूही.
