गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आणि बिपाशा बसू हे दोघेपण साजिद खानच्या ‘हमशकल्स’च्या शुटिंगसाठी लंडन येथे गेले आहेत. दोघेपण सध्या त्यांच्या आगामी काळात येत असलेल्या ‘हमशकल्स’ या विनोदी सिनेमाच्या शुटमध्ये बिजी आहेत.

अभिनयापासून कारकिर्दीची सुरूवात करून निर्माता बनलेला अभिनता रितेश देशमुख ‘हमशकल्स’मध्ये बंगाली ब्यूटी सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. बिपाशा, रितेश दोघे साजिद खानच्या ‘हमशकल्स’च्या चित्रिकरणासाठी लंडन येथे गेले आहेत. यावेळी बोलताना अभिनेत्री बिपाशा म्हणाली, लंडनमध्ये ‘हमशकल्स’ या सिनेमाच्या शुटसाठी अजून एक महिना घालवायचा आहे. येथिल महिना आनंदात जाईल असे वाटते. सध्या तरी येथील वातावरण खुपच छान आहे.
यावेळी बिपाशाने ‘हमशकल्स’च्या सेटवरून काही छायाचित्रे देखील टिवटरवर पोस्ट केली आहेत. येथील वातावरण चांगले असून दोघेपण सध्या आनंद घेत आहेत. या सिनेमात रितेश-बिपाशा सोबतच सैफ अली खान देखील काम करणार आहे.