ज्येष्ठ संशोधक डॉ. देगलूरकर यांना स्नेहांजली पुरस्कार

पुणे, – स्नेहल प्रकाशनाच्यावतीने साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना दिला जाणारा ‘स्नेहांजली पुरस्कार 2013म मूर्ती व उत्खनन शास्त्राचे अभ्यासक व ज्येष्ठ लेखक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात अनेक ठिकाणी उत्खननं झाली आहेत. तसेच, त्यांचे ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा, ‘मेगॉलिथिक रायपूर, ‘देवगिरी, ‘मार्कंडी मंदिरे आदी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. येत्या 3 ऑक्टोबर रोजी संध्या. सहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात आचार्य किशोर व्यास यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. देगलूरकर लिखित ‘घारापुरी दर्शन (एलिफंटा केव्हज) आणि वसुधा परांजपे लिखित समईच्या शुभ्रकळ्या या पुस्तकांचे प्रकाशन एकता मासिकाचे संपादक विद्याधर ताठे यांच्या उपस्थितीत होणार आहे.