मुंबई- विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचा-यांनी येत्या 25 सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया बँक असोसिएशन व बँक एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बँकातील सुमारे पाच लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचे युनियनचे नेते विश्वास उटगी यांनी सांगितले.
बँक कर्मचा-यांचा 25 सप्टेंबरला देशव्यापी संप
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलिनीकरण होऊ नये, कॉर्पोरेट भांडवलदारांना नवीन बँकांचे परवाने देऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी हा संप असणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात या दिवशी शेकडो कर्मचारी निदर्शनेही करणार आहेत.
