जगातील सर्वात मोठा रोबो ड्रॅगन

झॉलनर इलेक्ट्रॉनिक्स या जर्मन फर्मने जगातील सर्यात मोठा रोबो बनविला असून हा रोबो म्हणजे एक महाकाय ड्रॅगन आहे. फॅनी असे नामकरण केलेला हा रोबो51 फूट लांब, 40 फूट रूंद आणि 30 फूट उंच आहे. तोंडातून आगीचे लोळ फेकणारा हा ड्रॅगन चार पायांवर चालू शकतो. त्याच्या पंखांची रूंदी 40 फूट आहे. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तो चालतो. 2014 च्या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या एडिशनमध्ये जगातील सर्वात मोठा चालणारा रोबो म्हणून फॅनीची नोंद केली गेली आहे.

या ड्रॅगन रोबोला 272 व्हॉल्व्ह असून दोन हायड्रॉलिक सर्किट आहेत. तसेच 50 ड्राइव्ह असलेल्या या रोबोच्या हालचालींसाठी 4265 फूट लंांबीची इलेक्ट्रीक केबल वापरली गेली आहे. हा रोबो 1 तासात 1 मैलांचे अंतर कापू शकतो. 27 सप्टेंबर 2012 रोजी तो बांधून पूर्ण झाला. त्याची बांधणी करताना जर्मन लोकनाट्यातील प्रतिमांना अनुसरून त्याचे डिझाईन केले गेले. ड्रॅगन रोबोचे खेळ सुरू करण्यात आले असून 1950 मध्ये पूर्वेकडून देशाला असलेला कम्युनिझमचा धोका या थिमवर या खेळांची कथा आधारलेली आहे असे समजते.

Leave a Comment