फिक्सर क्रिकेटपटूंवर बंदीची कारवाई

नवी दिल्ली- आयपीएलच्या सहाव्या हंगामात स्पॉट फिक्सिंग करणा-या क्रिकेटपटूंवर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने शुक्रवारी कारवाई केली.

स्पॉट फिक्सिंग करणा-या अंकित चव्हाण आणि श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे. तर अमित सिंग आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांच्यावर अनुक्रमे पाच आणि एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मुंबईचा युवा क्रिकेटपटू हरमीत सिंगवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

तसेच फिक्सिंगचा आरोप असलेल्या अन्य क्रिकेटपटू अजित चंडीलाच्या कारवाईबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.