पुणे, – मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवार्ड्सम ( मिक्ता )या संघटनेचा गर्व महाराष्ट्राचा हा पुरस्कार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.मकाऊ येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या वर्षाच्या पुरस्कारासाठी दुनियादारी, धग आणि अनुमती या चित्रपटांमध्ये तर गेट वेल सून, प्रपोजल आणि फॅमिली ड्रामा या नाटकांमध्ये स्पर्धा होणार आहे. तर मिक्ताच्या पहिल्या पर्वाचा समारोप रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संगीत आणि नृत्याच्या अतिशय रंगत गेलेल्या अविस्मरणीय कार्यक्रमात झाला यानंतर पुरस्कारांची आणि अंतिम स्पर्धेसाठी नामांकने जाहीर करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कलानिधीचे अध्यक्ष नितेश राणे, मिक्तामचे मुख्य संयोजक महेश मांजरेकर, अनिरुद्ध देशपांडे, प्रसाद आपटे, सचिन अवस्थी उपस्थित होते.
जिवलग या मुंबईच्या प्रसिद्ध वाद्यवृंदाने यावेळी द म्युझीशियन हा संगीताने सजलेला कार्यक्रम सादर केला. अभिनेता पुष्कर श्रोत्री याने सूत्रसंचालन केलेल्या या अविस्मरणीय कार्यक्रमामध्ये अनेक गाजलेल्या गीतांचे केवळ वाद्यांवर सादरीकरण करण्यात आले. यावेळी अभिनेता वैभव मांगले याने गीत सादर केले तर, अभिनेत्री नेहा पेंडसे, अमृता खानविलकर, संस्कृती बालगुडे, मानसी नाईक, दिपाली सय्यद यांनी नृत्ये सदर केली.
चित्रपट विभागामध्ये दुनियादारी, धग आणि अनुमती या चित्रपटांमध्येतर गेट वेल सून, प्रपोजल आणि फॅमिली ड्रामा या नाटकांमध्ये पुरस्कारासाठी अंतिम स्पर्धा होणार आहे. चित्रपट विभागामध्ये दिग्दर्शक संजय जाधव, चंद्रकांत कुलकर्णी आणि शिवाजी पाटील यांना नामांकने जाहीर झाली. उत्कुष्ठ अभिनेत्यााठी अंकुश चौधरी, विक्रम गोखले आणि स्वप्नील जोशी. उत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी सई ताम्हणकर, उषा जाधव , प्रिया बापट तर सहाय्यक अभिनेत्यासाठी हृषीकेश जोशी, नागेंद्र भोसले, उपेंद्र लिमये तर सहाय्यक अभिनेत्रीसाठी सई ताम्हणकर, सुलेखा तळवलकर आणि उर्मिला कानेटकर यांना नामांकने मिळाली आहेत.
नाटक विभागामध्ये दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी, राजन ताम्हाणे आणि विजय केंकरे, अभिनेत्यासाठी संतोष जुवेकर स्वप्नील जोशी, आस्ताद काळे आणि मोहन जोशी. अभिनेत्री पुरस्कारासाठी रीमा, आदिती शारंगधर आणि सुकन्या कुलकर्णी सहाय्यक अभिनेत्यासाठी संदीप मेहता, सागर देशमुख, देवेंद्र सारळकर, सह अभिनेत्रीसाठी हेमांगी कवी, राधिका आपटे, आणि राधिका इंगळे यांना नामांकनेजाहीर करण्यात आली.