अक्षय-सुनील-परेश करणार हेरोफेरीचा रिमेक

बॉलीवुडमध्ये कॉमेडी सिनेमाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारे दिगदर्शक प्रियदर्शन येणा-या काळात सुपरहिट सिनेमा ‘हेराफेरी’चा तिसरा रिमेक तयार करीत आहे. आतापर्यंत त्यांनी हेराफेरी, हंगामा, हलचल, गरम मसाला, भागमभाग सारखी सुपरहिट कॉमेडी सिनेमे केले आहेत. प्रियदर्शनने कॉमेडी सिनेमेसोडून यावर्षी ‘आक्रोश’, ‘तेज’ आणि ‘रंगरेज’ सारखे सिनेमे केले आहेत. प्रियदर्शन आगामी काळात अजून एक कॉमेडी सिनेमा तयार करीत असून त्यामध्ये अक्षय-सुनील-परेश हे कॉमेडी त्रि‍कूट असणार आहे.

प्रियदर्शनने आगामी काळात येत असलेल्या कॉमेडी सिनेमासाठी त्याचे आवडते कलाकार अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना सोबत घेउन तो ‘हेराफेरी’ सिनेमाचा तिसरा भाग तयार करणार असल्या चे समजते. प्रियदर्शनच्या बॅनरखाली २००० साली तयार झालेल्या ‘हेराफेरी’ या सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा समावेश आहे.

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटामुळेच हा सिनेमा हिट झाला होता. त्यामुळेच त्यांनी आगमी काळात येत असलेल्याच सिनेमासाठी प्रियदर्शनने हेराफेरी या सिनेमाच्या सीक्वेलसाठी तिघांना साईन केले आहे. आगामी काळात लवकरच हेराफेरी या सिनेमाच्या रिमेकची शुटींग सुरू होणार आहे.