अध्यक्ष निवडीसाठी मालदीवमध्ये मतदान सुरू

माले – शनिवारी मालदीवमध्ये नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठीचे मतदान सुरू झाले असून अठरा महिन्यांनंतर पुन्हा होत असलेल्या या निवडणुकात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी येत आहेत. अठरा महिन्यांपूर्वी लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेल्या अध्यक्ष मोहमद नाशीद यांना वादग्रस्त परिस्थितीत राजीनामा द्यावा लागल्यानंतर ही निवडणूक होत आहे.

पृथ्वीवरचा स्वर्ग अशी मालदीव देशाची ओळख आहे. आत्ता होत असलेल्या निवडणुकीत चार उमेदवार रिंगणात आहेत. मोहम्मद वाहीद, नाशीद, अब्दुल यामीन व झुमर अशी त्यांची नांवे असून ते सर्वजण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. या निवडणुकांसाठी २२२९ स्थानिक तसेच १०२ आंतरराष्ट्रीय निरीक्षक आले असून १६४२ स्थानिक तर २२५ आंतरराष्ट्रीय पत्रकार या निवडणुकीचा आढावा घेत आहेत. मालदीव मध्ये मल्टीपार्टी लोकशाही आहे.

भारताने या निवडणुकांसाठी मदत दिली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने सहकार्याचा हात पुढे केला आहे तसेच भारतीय तंत्रविज्ञान तज्ञांनी या निवडणुकीसाठीचे सॉफटवेअर विकसित केले आहे. भारताचे माजी निवडणूक आयुक्त लिंगडोह, बी.बी. टंडन, एन गोपालस्वामी व माजी हायकमिशनर एस.एम गवई या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment