द.आफ्रिका-भारत दौ-याबाबत लॉर्गट काढणार मार्ग

जोहान्सबर्ग-दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचे नवे सीईओ हारून लॉर्गट यांची निवड झाल्याबने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कमालीचे नाराज झाले आहे. या सर्व बाबींचा विपरीत परिणाम भारताच्या आगामी काळात होत असलेल्याट दक्षिण आफ्रिकन दौर्याचवर होताना दिसत आहे. त्यासमुळे यावर मार्ग काढण्या्साठी लॉर्गट हे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना भेटणार आहेत. त्या चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल असे वाटते

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या वेस्ट इंडीज व न्यूझीलंड दौर्यालमध्ये दक्षिण आफ्रिकन दौर्या्ला ‘रेड सिग्नल’ मिळणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. आता भविष्यातील दौरा सुखरूपपणे होण्यासाठी दस्तुरखुद्द लॉर्गट बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना भेटणार असल्याचे समजते. दोघामधील चर्चेतून मार्ग निघाला तरच आगामी काळात हा दौरा करणे शक्य‍ होणार असल्याचे समजते.

दोन्ही बोर्डाचे पदाधिकारी १५ आणि १६ सप्टेंबर या कालावधीत भेटणार असून या बैठकीत या दौर्या बाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याआधी या दौर्या त दोन देशांमध्ये तीन कसोटी, सात वन डे आणि दोन ट्वेण्टी-२० सामने होणार होते, पण बीसीसीआयने यावर शिक्कामोर्तब केले नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकन बोर्डाची पंचाईत झाली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment