सिरीयन क्रायसिसमुळे अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा सध्या व्यग्र असले तरी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि ओबामा यांची पूर्वनियोजित भेट २७ सप्टेंबरला व्हाईट हाऊस येथे होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मनमोहनसिंग सध्या रशियातील पिटसबर्ग येथे जी २० समिटसाठी गेले आहेत मात्र तेथे ओबामा यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता नाही मात्र या आठवड्यात हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधणार आहेत असेही सांगितले गेले आहे.
सिरीयात लष्करी कारवाई करायचा निर्णय ओबामा यांनी जाहीर केला असून त्यांना अमेरिकन काँग्रेसच्या पाठिंब्याची प्रतीक्षा आहे. अमेरिकेने या कारवाईच्या समर्थनासाठी १०० देशांशी संपर्क साधला असून त्यातील ३४ देशांनी अमेरिकेला पाठिबा दर्शविला आहे. मात्र भारताने सिरीया हा सार्वभौम देश असल्याने युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलची मान्यता मिळेपर्यंत अमेरिकेच्या कारवाईला समर्थन नसल्याचे जाहीर केले आहे.
मनमोहनसिंग २८ सप्टेंबर रोजी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेब्लींसमोर भाषण करणार आहेत.