
पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात एका संशयिताला शिर्डीत पकडण्यात आल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर दोन संशयितांची जी रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती त्यातील दुसर्या रेखाचित्राशी साम्य असणार्या् एका इसमाला शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळील गेटवर शिर्डी वाहतूक पोलिस निरीक्षक अरविद भोळे यांनी पकडले.
