पुणे,:डॉ दाभोळकर यांच्या संशयित मारेकर्याचे अजून एक रेखा चित्र पुणे पोलीसांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या हत्येला आज तेरा दिवस पूर्ण झाले तरी तपासाच्या दृष्टीने काही कोंडी फुटलेली नाही.डॉ दाभोलकर यांच्या मारेकर्यांना पळून जाताना पाहणार्या अन्य दोन साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचा उलगडा होण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
डॉ दाभोळकर यांच्या मारेकर्याचे अजून एक छायाचित्र प्रसिद्ध
पोलिसांनी यापूर्वीच पहिल्या मारेकर्याचे एक रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडताना या मारेकर्यांना पाहणार्या एका प्रत्यक्षदर्शीने पुढे येत पोलिसांना मारेकर्याचे वर्णन केले. यावरून हे रेखाचित्र रेखाटण्यात आले. मात्र, पोलिसांना या छायाचित्राच्या आधारे मारेकर्यांपर्यंत पोहोचण्यात अद्याप यश आलेले नाही. आता अन्य दोन प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या वर्णणावरून पोलिसांनी दुसर्या मारेकर्याचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे.
जंगली महाराज रस्ता, शनिवार पेठ परिसरातील वेगवेगळ्या सात सीसीटीव्ही’ कॅमेर्यांमध्ये दाभोलकरांचे मारेकरी पळून जाताना कैद झाले आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी साडे सातच्या दरम्यान शिंदे पाराकडून आलेल्या मारेकर्यांना जंगली महाराज रस्ता, शनिवार पेठ परिसरातील सात ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यांनी टिपले आहे. पोलिसांकडून अजूनही काही कॅ मेर्यांचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासण्यात येत असून त्याआधारे मारेकर्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. आरोपींनी दाभोलकरांची रेकी केली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
