डॉ. सुधाताई काळदाते यांचे निधन

पुणे, :ˆ आणिबाणीत सर्व शक्तिनिशी लढणारे माजी खासदार बापू काळदाते यांच्या पत्नी आणि त्याच त्यागाने आणिबाणीत काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या डॉ सुधाताई काळदाते यांचे आज दुपारी 12 वा.पुण्यात निधन झाले. त्या 79 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे दोन मुली व त्यांचे परिवार आहेत.

एस.एम.जोशी यांच्या सल्ल्यानुसार सुधाताईंनी आंतरजातीय विवाह केला होता. डॉ. सुधाताई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख होत्या. महाराष्ट्रातील त्या नामवंत समाजशास्त्रज्ञ होत्या. सुधाताईंनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, सुभाष वारे आदी उपस्थित होते.