
नवी दिल्ली – काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. मात्र सोनिया गांधींच्या आजाराबाबत तेसच त्यांना काय त्रास होत आहे; याबाबत अधिक माहिती देण्यास या नेत्याने नकार दिला आहे. सोनिया गांधी उद्या अमेरिकेसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.
