नवी दिल्ली – देशातील उद्योग व अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नरेंद्र मोदी हे उत्तम पंतप्रधान सिद्ध होतील का हे सांगणे कठीण असल्याचे मत गोदरेज उद्योगसमुहाचे अध्यक्ष आदि गोदरेज यांनी व्यत्त केले आहे. एका न्यूजवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

गोदरेज म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी गुजराथमध्ये उत्तम काम केले आहे. पंतप्रधान अथवा केंद्रीय मंत्री म्हणून केंद्रातही ते चांगली भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी अद्यापी केंद्रात कोणतीच जबाबदारी पार पाडलेली नाही. अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द असलेले नेते केंद्रात चांगला प्रभाव पाडू शकत नाहीत असा अनुभव आहे. यामुळे मोदी भविष्यात पंतप्रधान बनले तरी ते किती उत्तम ठरतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे.