पूनमला हवेत तीन कोटी

सिनेअभिनेत्री पूनम पांडे तिच्या अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे चर्चेत राहणारी मॉडेल आहे. बिग बॉस’ निर्मात्यांनी पूनमला शोच्या सातव्या पर्वासाठी दोन ते अडीच कोटी देऊ केले आहेत. पण, तीन कोटींवर अडलेल्या पूनमने या शोची ऑफर धुडाकावून लावल्याचे सांगण्यात येत आहे.

‘बिग बॉस’ या रिअलिटी शोमध्ये खळबळजनक विधानांनी चर्चेत असणा-या आणि अधिकाधिक वादग्रस्त स्पर्धकांना सहभागी करुन घेतले जाते. त्यामुळे यंदाच्या पर्वात ‘नशा’ चित्रपटाची अभिनेत्री पूनम पांडेचे नाव ‘बिग बॉस’च्या यादीत असण स्वाभाविक आहे. बिग बॉसचे निर्माते गेल्या तीन सीझनपासून पूनमला संपर्क साधत होते. बिग बॉस’ निर्मात्यांनी पूनमला शोच्या सातव्या पर्वासाठी दोन ते अडीच कोटी देऊ केले आहेत. पण, तिला या शोसाठी तीन कोटीं हवे आहेत.

दोघांचेही आर्थिक गणित जमत नसल्यामुळे पूनम या शोमध्ये झालेली नाही. मात्र, यंदाही पूनमच आर्थिक गणित काही जुळताना दिसत नाही.
यापूर्वी, पूनम ‘खतरो के खिलाडी’ या रिअलिटी शोमध्ये दिसली होती.

Leave a Comment