मुंबई- शक्ती मिलमध्ये महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर रविवारी रात्री बलात्काराच्या एकूण तीन घटना घडल्या आहेत. मुंबईत एकाच रात्री विविध भागात बलात्काराच्या तीन घटनांची नोंद झाल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ओशिवरा भागात पहिली घटना घडली असून, एका नराधमाने ४ वर्षीय अल्प वयीन मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेत आरोपीने याच परिसरातून मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यांतर तिला पुन्हा ओशिवरा परिसरात सोडून दिले आणि या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे.
दुसरी घटना वर्सोवा येथे घडली. येथे एका मुलीने तरूणावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी मुलीसोबत जबरदस्ती बलात्कार करणा-या तरूणाला अटक केली आहे.
तिसरी घटना जोगेश्वरी भागातील असून, आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याची तक्रार एका तरूणीने नोंदवली आहे. तीनही घटनांबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईत एकाच रात्री बलात्काराच्या तीन घटनांची नोंद झाल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.