मुंबई – गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार झालेली २३ वर्षीय महिला पत्रकार रुग्णालयातील उपचार पूर्ण होऊन घरी परतली आहे. तिच्यावर एका निर्जन ठिकाणी चौघांनी बलात्कार केला होता आणि ती त्यानंतर रुग्णालयात उपचार घेत होती. आता ती वैद्यकीयदृष्ट्या सामान्य झाली असल्याने तिला घरी सोडण्यात आले आहे.
मुंबई बलात्कार पीडित युवतीला डिस्चार्ज
तिच्यावर उपचार करण्यासाठी उत्तम डॉक्टरांची सेवा बहाल करण्यात आली होती आणि तिच्यावर विशेष लक्ष देण्यात आले होते. तिनेही उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला. अशा रुग्णांच्याबाबतीत त्यांची मानसिक उभारी अधिक महत्त्वाची असते. ती तिच्याकडे असल्यामुळे तिला लवकर बरे होणे सोपे गेले असे जसलोक रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
डॉ. तरंग ग्यानचंदानी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच मानसोपचार तज्ञाकडून तिचे समुपदेशनही केले जात होते. या बलात्काराच्या प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आणि तिच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. सरकारही तिच्याबाबत अधिक सावध झाले आणि परिणामी तिला उत्तम वैद्यकीय मदत दिली गेली. तिच्यावर बलात्कार करणार्या पाचही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे.
